चंद्रपुरात लिपीक संवर्गाचे असहकार बेमुदत कामबंद आंदोलन



चंद्रपुरात लिपीक संवर्गाचे असहकार बेमुदत कामबंद आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व विभागातील लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासुन वेतनश्रेणीत असलेली तफावत दुर करुन सुधारीत वेतन श्रेणी लागू करणे व पदोनती स्तर कमी करुन पदनाम बदल व जुनी पेंशन लागू करणे संदर्भात असहकार व कामबंद आंदोलन दोन दिवसापासून सुरू असून शासकीय निमशासकीय कामे बंद झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच कार्यालयात येण्याला नागरिकांना कामाचा कोळंबा झाला आहे. त्यांना आल्या पावली काम न होताच परत जावे लागत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सेवेत येणा-या सर्व विभागातील लिपिक संवर्ग हा शासन व प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असून शासनाच्या सर्व विभागातील प्रमुख अधिकारी संवर्गापासून ते लोकनियुक्त उच्चपदस्थ लोकप्रतिनिधी पासुन ते शेवटच्या संवर्गाच्या घटकांपर्यंत सर्वांची आस्थापना ही जबाबदारीने लिपिक संवर्गावर आहे.
महाराष्ट्रातील लिपीक संवर्गातील प्रामुख्याने चौथा वेतन आयोगापासुन वेतनत्रुटी अद्यापही सुधारीत करण्यात आलेली नाही. तसेच पदोन्नतीचे स्तर कमी करणे, जुनी पेन्शन योजना लागु करणे याबाबत राज्यसंघटनेने मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय व मा. मुख्य सचिव महोदय यांना संदर्भिय पत्रान्वये निवेदन यापुर्वी शासन स्तरावर दिलेले. शासन निर्णय घेत नसल्याने
दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय निमशासकीय कार्यालयातील लिपीक संवर्गाचे असहकार बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले . शासनाने याची दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याची माहिती. आंदोलनाला बसलेले तालुका अध्यक्ष महेश दिवसे, विनोद गेडाम,तालुका कोषाध्यक्ष समाधान वाघमोडे,तालुका उपाध्यक्ष कु. साधना मन्त्रे, तालुका सचिव,सौ. सारीका चिवंडे, श्रीमती रुपा मेश्राम,श्रीमती देविकला झरकर,श्रीमती विभा वैद्य, हारुन मंहमद निसार,आनंदराव नवले ,श्रीमती ममता पेंचलवार,रुपेश आघात, संदिप मेडे, राजेश करंडे, सुनिता बाढई, गिता कामीडवार, मिनल निळे, रवि नेरलवार, शितल बेरकाडे, छाया मेश्राम, कमल उईके, यास शेकडो कर्मचारी यांनी असहकार सामुहीक आंदोलन कार्यक्रम हीरहिरी ने सहभाग नोंदविला .
शासनाने आमच्या रास्त मागण्या मान्य कराव्या. नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.