... 'हे' दिसत नाही का? झेडपीसमोर, वाहतूक विभागाची डोळे झाक !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील मिनी मंत्रालय असलेले जिल्हा परिषद कार्यालयासमोर अख्या वाहनाच्या रांगाच्या रांगास नो पार्किंगच्या ठिकाणी लागले असतात. मुख्य वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारच्या वाहनांच्या लांबच लाभ लागलेल्या रांगा वाहतूक विभागाला दिसत नाही का? असा प्रश्न आता चंद्रपूरकरांना पडला आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हितासाठी नागरिकांना काटकसरीचे धोरण अवलंबकरण्याची आव्हान केले.
त्याचे पडसाद शासकीय, निमशासकीय यासह सर्वसामान्यवर पडू लागले आहेत. देशात पेट्रोल, डिझेल, एलपीजी किंवा कच्च्या तेलाच्या वापर कमी करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी केले. त्याचे पडसाद चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये ही दिसून आले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी आपली पेट्रोलची, डिझेलची गाडी न वापरता ई बाईकने कार्यालयात येत असतात असे म्हटले जाते. अशातच कार्यालयातील कर्मचारी, व जिल्हा परिषद च्या कार्यालयात येणाऱ्या फोरविलर, टू व्हीलर यांच्यावर दंडात्मक कारवाई आकारण्यात येत असून, डबल सीट आलेल्यांना कार्यालयाच्या आत मध्ये एन्ट्री मिळते. सिंगल असेल तर, त्याकडून दंडात्मक कारवाई आकारली जात असल्याचे समोर येत आहे. म्हणजेच एकंदरीत इंधनाची बचत काटकसरीने करण्याच्या पंतप्रधानाच्या आव्हानाला जिल्हा परिषदेचे सिओ प्रतिसाद देत असल्याची बाब समोर येत आहे.
हे खरे असले तरी, चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर नो पार्किंग झोन असताना अगदी कार्यालयाच्या समोर वाहनाचा तापाच लागला असून वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे, हे संबंधित वाहतूक विभागाला दिसत नाही का? की जिल्हा परिषदच्या नो पार्किंग झोनला, वाहतूक विभागाच्या डोळेझाकपणा आहे ?का असा प्रश्न सामान्य आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
पहिले चंद्रपूर शहरात वाहतूक नियमाचा बोजवारा वाजला असून, वाहतूक व्यवस्थेमुळे आतापर्यंत कितीतरी नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीपण जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन, मनपा प्रशासन यांना शहरातील वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रित करणे जमले नाहीत. चंद्रपूर शहरात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देऊन चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडीचा मार्ग मोकळा करतील काय? याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.
