चंद्रपूर पंचायत समितीतील सेस फंडातील कामे एकाच कंत्राटदाराला !
ग्रामपंचायतने निविदा न काढणे भोवणार?
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
चंद्रपूर पंचायत समिती व अंतर्गत येत असलेल्या काही ग्रामपंचायत मध्ये सन २०२५/२०२६ या वित्तीय वर्षातील पंचायत समिती सेस फंड सुधारित आराखडा च्या तरतुदीनुसार ग्रामीण भागातील शासकीय इमारतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शासकीय इमारतीच्या छता वरील पाणी जमिनीत साठवन करून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपाय योजना करण्यास पंचायत समिती मासिक सभा ठराव दिनांक २३/०१/२०२६ नुसार प्रती ग्रामपंचायत दोन लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून खालील प्रमाणे चिचपल्ली, जुनोना, शेनगांव, मोहरली, वरवट, म्हातारदेवी, बेलसनी, ऊर्जानगर अशा आठ ग्रामपंचायती असून काही ग्रामपंचायतींना दोन ते तीन कामाचे ठिकाण देऊन अनुदान देण्यात आले. एकूण जवळपास या ग्रामपंचायतला 32 लाखाचे अनुदान कामासाठी खर्च करण्यात आले आहेत.
त्यात प्रत्येक ठिकाणाच्या कामासाठी दोन लाखाचे अनुदान ग्रामपंचायतचा देण्यात आले. संबंधित ग्रामपंचायते कुठलीही निविदा न काढता संपूर्ण कामाचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिल्याचे सामोरे येत आहे. पुढे बाकी कंत्राट दारात नाराजीचा सूर असून, हे कंत्राट एका कंत्राटदाराला दिल्याने हा कंत्राटदार पंचायत समितीचा जावई तर नाही ना! अशी चर्चा होत आहे.
चंद्रपूर पंचायत समिती अंतर्गत 48 ग्रामपंचायती असताना या आठ ग्रामपंचायतची अंतिम निवड करण्यात आलेली आहे.
सदर कामाकरिता प्रती ग्रामपंचायत दोन लक्ष प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येत आहे. या कामाचे इस्टिमेट संबंधित ग्रामपंचायत ने तयार करून कुठल्याही वर्तमानपत्रात निविदा न दिल्याचे सामोरे येत आहे. त्यामुळे संशयाची खिळ ग्रामपंचायत वर ओढली जात आहे.
त्याचप्रमाणे 15 वित्त आयोग, दलित वस्ती निधी, सामान्य फंड यास इतर लाखोचे अनुदान ग्रामपंचायतींना मिळत असतात. परंतु ग्रामपंचायत कडून अनेकदा निविदाच काढल्या जात नसल्याचे प्रत्यक्ष प्रकार समोर येतात.
कित्येकदा कामे एकाच कंत्राटदार दिल्याचे समोर येत असताना पंचायत समिती स्तरावरून काहीही
कारवाई केली जात नाही.
सेस फंड या निधीच्या वाटपात मुख्य कार्यकारी अधिकारी काय चौकशी करतात याकडे लक्ष लागले आहे.
