गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामाची चौकशी समिती समोर होणार चौकशी ? अभियंता, कंत्राटदाराच्या मलाईत रस्त्याचे वाटोळे !



गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामाची चौकशी समिती समोर होणार चौकशी ?
अभियंता, कंत्राटदाराच्या मलाईत रस्त्याचे वाटोळे !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील चिमूर तालुका येत असलेल्या गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याच्या कामा संदर्भात चौकशीची समिती नेमून तक्रारदार व प्रसारमाध्यमा समोर चौकशी करावी अशी मागणी पालकमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असून लवकरच त्या रस्त्याच्या कामासंदर्भात चौकशी नेमण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
उपरोक्त कामाबद्दल आपणास दिनांक 27/3/2026 तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता यांनी दिनांक 29 /5/2026 आपल्या पत्रा अनुसंगाने आम्हास कळवले की, मोजमा पुस्तके नुसार कामात काही चुकीचे झालेले नाही. झालेल्या कामाची सुद्धा वेळोवेळी तपासणी केली. संबंधित कामाचे पारदर्शकता राखण्यासाठी कामाचे माहिती फलक लावण्यात आले.
परंतु सदर काम हे मोजमाप पुस्तके नुसार झाले नाहीत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने अहवाल सादर करून जिल्हाधिकारी यांची
दिशाभूल करून अहवाल सादर केला. त्या अहवालासी तक्रारदार व गावकरी सहमत नाहीत. म्हणून आपण आपल्या कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमून सोबत तक्रारदार व प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी यांच्यासमोर संबंधित कामाची चौकशी करावी. अशी मागणी करण्यात आली.
ज्याप्रमाणे मोजमाप पुस्तका(एमबी) त्यानुसार काम करण्याची गुणवत्ता, व कामात पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण काम होणे गरजेचे आहे.
GSB 20 cm, WBM 7.5 cm, MPM 5.cm,
2 cm, कास्फेट डांबर करून ते काम पूर्ण   म्हणजे 34.5. Cm. सेंटीमीटर  याप्रमाणे काम होणे अपेक्षित होते.  एम एम गिट्टीचा थर टाकून चुरा  गिट्टी पसरवून पाणी टाकून रोड रोलर मी योग्य दाब करणे आवश्यक असताना मात्र या रस्त्यात माती असलेल्या ठिकाणीच बारीक गिट्टीचा चुरा टाकून त्यावर डांबर टाकल्याचे आढळून  येत आहे.
 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या विभागाकडून अहवाल सादर केला आहे.  परंतु तो अहवाल 
   रस्त्याचा दर्जा (क्वाँलिटी ) मोजमाप पुस्तके नुसार  नाही, 
 म्हणून संबंधित कामाची चौकशी समिती नेमून, तक्रारदार व प्रसारमाध्यमासमोर चौकशी व्हावी,  अशी मागणी करण्यात आली आहे. या कामात कंत्राटदार व  अभियंता
 यांच्या मलाईत या रस्त्याचे वाटोळे झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे. लवकर या रस्त्याच्या कामासंदर्भात चौकशी समिती नेमून जर रस्त्यात मोजमा पुस्तके नुसार 
 काम झाले नसल्यास  संबंधित कंत्राटदारावर व  अभियंत्यावर योग्य ती कारवाई करावी, व संबंधित रस्त्याचे काम  पुन्हा जसेच्या तसे  मोजमाप पुस्तके नुसारच करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामाची चौकशी न झाल्यास  जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर  एक दिवसीय  धरणे आंदोलन करण्यात येईल.  असा इशाराही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रानुसार करण्यात आला आहे.