चंद्रपूर विधुत कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात बेमुदत काम बंद... ! पत्रकार परिषदेतून तीन दिवसानंतर काम बंद करण्याचा...!



चंद्रपूर विधुत कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशनच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात बेमुदत काम बंद... !

पत्रकार परिषदेतून तीन दिवसानंतर काम बंद करण्याचा...!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये विविध विद्युत कामे करणारे सुमारे 50 विद्युत ठेकेदार व त्यांच्यावर अवलंबून असलेले 1000 पेक्षा अधिक कामगार आज अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीत जीवन जगत आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून मागील वर्षे 2025-26 पासून आजपर्यंत अनेक कामांची देयके बजेट नसल्यामुळे अदा करण्यात आलेली नाहीत. कामे पूर्ण करून ही संबंधित ठेकेदारांना त्यांच्या बिलांची रक्कम मिळालेली नसल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुसरीकडे, बजेटच्या अभावामुळे नवीन कामांना मंजुरी मिळत नसून कामे करून सुध्या नवीन वर्क ऑर्डर देखील दिल्या जात नाहीत.
वीज वितरण व्यवस्थेच्या विकासासाठी दिवस-रात्र मेहनत घेणारे ठेकेदार व कामगार आज शासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक ठेकेदार व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर जातील व हजारो कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होतील. अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून
संघटनेचे अध्यक्ष दिलीप वावरे, सीलवन डोके, सचिन कुंभलकर, प्रवीण डेकाटे, रवी काटकर, पंकज पेटकर, या संघटनेचे पदाधिकारी यांनी दिली.
एप्रिल 2025-26 पासूनची प्रिव्हेंटीव्ह व ब्रेक डाउन मेन्टेनन्स तसेच NSC व DPDC सर्व प्रलंबित बिले तात्काळ अदा करण्यात यावीत.
वीज वितरण कंपनीसाठी वर्षे 2026-27 चे आर्थिक वर्षाकरिता आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा.
प्रलंबित असलेल्या मागील वर्षांमधील झालेल्या कामाचे मेन्टेनन्स वर्क ऑर्डर व पर्चेस वर्क ऑर्डर देऊन सदर कामांच्या देयकांसाठी विशेष निधी मंजूर करण्यात यावा.
चालू वर्षात नवीन विद्युत कामे, देखभाल व दुरुस्ती ची कामे व विकास कामांसाठी तात्काळ वर्क ऑर्डर जारी करण्यात याव्यात.
ठेकेदारांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन बँक गॅरंटी व इतर आर्थिक अटींमध्ये शिथिलता देण्यात यावी. या संदर्भाचे निवेदन मुख्य अभियंता, तसेच संबंधित मंत्रालयातील विभागाला पाठपुरावा करण्यात आला असला तरी कुठलीही दखल घेण्यात आली नाही.
संबंधित कंत्राट दराचे चाळीस ते पन्नास करोड निधी थकीत असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. संपूर्ण कंत्राटदार आज कर्जबाजारी झाली असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.
वरील मागण्याच्या पूर्तता न झाल्यास येत्या तीन दिवसात  चंद्रपूर विधुत कॉन्ट्रॅक्टर अससोसिएशन तर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्हामधील विधुत कंत्राटदारानि बेमुदत कामे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कालावधीत वीज ग्राहकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास महावितरण जबाबदार राहिल. असे पत्रकार परिषदेतून त्यांनी  सांगितले.