"श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळा"
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
अयोजक सकल तेली समाज महासंघाचे श्री राजेश वारलूजी बेले राहणार आहेत.सकल तेली समाज महासंघ चंद्रपूर द्वारा श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पायदळ पालखी वारी सोहळा व सत्कार सोहळा दि १२ जून २०२६ ला सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्रचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणविस हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माजी वित्त , नियोजन व वनमंत्री श्री डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत माननीम आमदार विजयभाऊ वडेट्टीवार माजी विरोधी पक्षनेते, पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, विधान परिषद सदस्य अँड अभिजितजी वंजारी, चंद्रपुर लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोरभाऊ जोरगेवार, विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यस प्रा.डॉ. संजय बेले, अयोजक सकल तेली समाज महासंघाचे श्री राजेश वारलूजी बेले राहणार आहेत.
श्री संताजी जगनाडे महाराज यांची पाय पालखी चारी पंढरपूर येथे चंद्रपूर ते शिवपूर (अल्लीपुर ने पंढरपूर असा ४२ दिवसाचा प्रवास करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेवून परत येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही पालखी संताजी परिवार व गुरुदेव परिवारातील वारकरी काढतात या वारीत सर्व समाजातील भक्तगण असतात. आषाढी एकादशी श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी जाणारे वारकरी सर्व जनतेला सुख , समृध्दी व शांती आणि समाधान मिळावे यासाठी आराधना करतात.
सकल तेली समाज महासंघ चंद्रपूर जिल्हातील सर्व समाजातील जनतेला या भव्य सोहळ्यास उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक आवहान करीत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत राजेश बेले, डॉ संजय बेले ,रवि लोणकर, आकाश साखरकर, सोहम बुटले, चंदाताई ईटनकर, कोकीबाताई पोटदुखे, रोहन घोंगळे, दादाजी अगडे मुक्ताई लोखंडे सुनंदा येनुरकर
कवीता वैरागडे,वर्धन चवरे,कल्पना ताई गिरडकर, चंदाताई ईटनकर, योगितालाई पोटदुखे,सुवर्णाताई लोखंडे,सौ. कुमुदलाई खनके ,
वैशालीताई गिरडकर,अनिताताई वैरागडे,अनिताताई हजारे, ज्योती येनुरकर, शुभांगी चवरे, हेमलता चवरे, विधा चवरे, रमेश खनके गणेश यरणे
व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
