... यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे, की अवैध धंदेचा पाठ राखणदार ?




... यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे, की अवैध धंदेचा पाठ राखणदार ?

दिनचर्या न्युज :-
​चंद्रपूर -
स्वतःला चाणक्य बुद्धीचा महामेरू समजणाऱ्या आणि 'नीट अँड क्लीन' प्रतिमेचा आव आणणाऱ्या जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आला आहे. स्वतःला लोकाभिमुख म्हणवून घेणारा हा नेता प्रत्यक्षात ' लोकप्रतिनिधी'' नसून करोडो रुपयांची दलाली खाणारा 'कमिशनखोर' अवैद्य धंद्याचा पाठ राखणदार आहे काय, असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. सुरवातीच्या राजकारणापासून घुग्गुस आणि ताडाली परिसरातील उद्योगांमधील गरीब कामगारांच्या टाळूवरचे लोणी खाणारा हा पांढरपेशा लोकप्रतिनिधी मूळचा दलालीच्याच कुशीतून जन्मास आला आहे का? असा रोकडा प्रश्न आता विचारला जात आहे.

⭕प्रशासनाच्या डोळ्यात धूळ; नातेवाईकांच्या माध्यमातून माया गोळा करण्याचा धंदा!

​आपल्या राजकीय वजनाचा गैरवापर करत या महाशयांनी रेती तस्करी आणि कोळसा उद्योगातून चक्क करोडोंची लूट चालवली आहे. ही लूट साधीसुधी नसून, प्रशासनाच्या डोळ्यात थेट मिरची फेकून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केली जात आहे. स्वतः पडद्यामागे राहून घुग्गुस, राजुरा, गडचांदूर, आणि चंद्रपूर परिसरातील पूरक व्यवसायांमध्ये आणि अवैध धंद्यांमध्ये या महान आमदाराने आपले सख्खे नातेवाईक, भाचे, पुतणे आणि भागीदार नावाचे 'योद्धे' उतरवले आहेत. एका बाजूला विवेक बुद्धीचा आव आणणारे एक व्यक्तिमत्व एका ठिकाणचा मुख्य व्यापार सांभाळत आहे, तर दुसरीकडे भाचा आणि पुतण्याला अवैध धंद्यातून काळी माया जमवण्याचे थेट 'टार्गेट' देण्यात आले आहे का? अवघ्या काही दिवसांतच करोडो रुपयांच्या अवैध संपत्तीचे डोंगर उभे करणारा हा 'लाडका' आमदार जिल्ह्याला लागलेली वाळवी तर नाही ना?

⭕देवा रे देवा..! रेती आणि कोळशातून करोडोंची महामाया गोळा करणाऱ्या या लोकप्रतिनिधीची भूक कधी मिटणार?
​'रीलबाज' आमदाराला विकासाची व्याख्या तरी कळली आहे काय?
​प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना किरकोळ गोष्टींवरून धारेवर धरणारे, कॅमेऱ्यासमोर मोठ्या हिमतीने जाब विचारणारे हे आमदार महोदय स्वतःला मात्र जनतेने प्रश्न विचारलेला खपवून घेत नाहीत! छोट्या-छोट्या गोष्टींवरून अधिकाऱ्यांवर खेकसून जणू काही फार मोठा तीर मारला, अशा थाटात सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणाऱ्या या 'रीलबाज' आमदाराला जिल्ह्याच्या विकासाची व्याख्या तरी कळाली आहे काय?
​आज जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुण रोजगारासाठी वणवण भटकत आहेत, तरुण पिढीचा आवाज दबला जात आहे, असे असताना या '..दा ..रा'नी एका तरी तरुणाला एखाद्या कंपनीत साधी नोकरी लावून दिली आहे का? याचे उत्तर 'नाही' असेच मिळते! तरुणांच्या भविष्याशी खेळणारा हा लोकप्रतिनिधी नेमका कोणाचा विकास करत आहे?
​दोन तोंडी भूमिका: पोलिसांवर दबाव, पण स्वतःच्या घरात मात्र पोकलेनने रेती उपसा!
​या आमदाराचा दुटप्पीपणा पाहून डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. ८-१० देशी दारूचे टिल्लू पकडून देऊन पोलिसांना 'दारू सुरू आहे' भाच्या-पुतण्यांच्या पोकलेन मशिनी जेव्हा नदीपात्रात उतरतात, तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून झोपतात का? दोन-दोन रेती घाटांवर राजरोसपणे पोकलेन मशीन टाकून अवैध रेती उपसा सुरू असताना या आमदाराला जाग का येत नाही? का तिथे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर दबाव तंत्र वापरण्यातच मग्न असतात.
तिथे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत नाही का? की तिथे मिळणारा 'वाटा' तोंड बंद ठेवण्यासाठी पुरेसा आहे?
​पैशांच्या जोरावर मतदार खरेदीचा डाव आणि निष्ठावंतांना केराची टोपली!
​या आमदाराचे कारनामे इथेच संपत नाहीत. निवडणुकीच्या रिंगणात निष्ठावंत, प्रामाणिक कार्यकर्त्यांना बाजूला सारून निव्वळ 'वजनी हत्ती' जवळ करणाऱ्या या नेत्याने पैशांच्या जोरावर मतदार खरेदी करण्याचाही नीच प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे.
त्या नेत्याची वैचारिक पातळी काय असेल, हे सांगण्याची गरज नाही. म्हणून याला लोकप्रतिनिधी म्हणायचे, की अवैध धंदेचा पाठ राखणदार ?