चंद्रपूर जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान




चंद्रपूर जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद येथे कर्मचाऱ्यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला आला.
पुलकित सिंग यांनी स्वतः रक्तदान केले. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे गरजू रुग्णांना रक्तपुरवठा व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेचे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हा परिषद च्या जवळपास 20 च्या वर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
सध्या शासकीय रुग्णालयात रक्तांचा तुटवडा भासत असून सामाजिक संस्था, रक्तदात्यांनकडुन रक्तदान करण्याचे आव्हाने करण्यात येत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्याकडून राज्य रक्त संक्रमण परिषदेत तर्फे रक्त दात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
'रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान' असून एखाद्या गरजवंत रुग्णांचे आपल्या रक्तामुळे प्राण वाचू शकते. म्हणून रक्तदान ही काळाची गरज आहे. असे एका रक्तदात्यांनी का सांगितले.