जिल्हा परिषद समोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे व निदर्शने आंदोलन



जिल्हा परिषद समोर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे व निदर्शने आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा परिषद समोर आज माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमि शाळा व खाजगी अनुदानित विजाभज / आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक-शिक्षके कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे वत ( मा. शिक्षणाधिकारी माध्य.) जि.प.चंद्रपूर यांचे कार्यालयासमोर दिनांक २५ जुन २० रोज गुरूवारला दुपारी ३.०० ते ५.०० दरम्यान धरणे, निदर्शने आंदोलन करण्यात
यावेळी शिक्षकाकडून नारेबाजी करण्यात आली. प्रलंबित मागण्या संदर्भात वेळोवेळी शासन दरबारात मागण्या केल्या असताना सुद्धा कुठलेही ठोस पाऊल शासनाकडून उचलण्यात आले नाहीत. नेहमीच आश्वासन देऊन वेळ मारून नेत असल्याचे धोरण अवलंबले जाते. म्हणून आज माध्यमिक शिक्षण विभाग माननीय शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारात आपल्या मागण्याचे निवेदन शासन दरबारात पोहोचण्याचे आश्वासन दिले. त्यावेळेस विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचे जगदिश जुनगरी,सुनिल शेरकी,
. शकील,दिपक धोपटे,सुरेंद्र अङबाले ,कार्यवाह महानगर विमाशि. संघ यासह शेकडो शिक्षकांची उपस्थिती होती.