सावली वनपरिक्षेत्रात सामदा येथील इसमाचा वाघाने घेतला बळी ! आठवड्यातील दुसरी घटना !
परिसरात दहशतीचे वातावरण
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :(सावली)
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात एकाच आठवड्यातील दुसरी घटना झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागावर नागरिकाच्या रोष व्यक्त होत आहे.
सावली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४९७ येथे काल रात्री साडेनऊ वाजता च्या दरम्यान बीट सामदा येथील हेमंत अशोक बुरशे वय वर्ष 40 या गुराख्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. चार दिवसांपूर्वीच सनी पेडगाव येथील गुराखी वासुदेव लक्ष्मण वाकुडकर वय 68 वर्ष यांना वाघाने ठार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा सावली वनपरिक्षेत्रात हेमंत चा नाहाक बळी गेला. या घटनेमुळे दहशतीचे वातावरण असून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संबंधित व्यक्तीचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
