खत्री महाविद्यालय व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि आदरणीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. अभय क. लाहोटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९/०९/२०२६ रोजी खत्री महाविद्यालय व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे कायदे विषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात खत्री महाविद्यालय, चंद्रपूरचे प्राचार्य श्री. जनार्धन काकडे सर, प्राद्यापीका सौ. करूणा खोब्रागडे, सौ. ज्योत्सना मोहितकर, ईतर प्राद्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते.
सदरील कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. सुधीर एस. इंगळे यांनी नागरिकांचे मूलभूत कर्तव्ये व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजना, व मध्यस्थी प्रक्रिया, इत्यादी विषयाबाबत विद्यार्थ्यांचे विस्तृत मार्गदर्शन केले. या सोबतच अॅड. महेंद्र बी. असरेट यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) याबाबत विद्याथ्यांचे मार्गदर्शन केले.
यासोबतच सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर येथे सुध्दा कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. काटकर सर, अॅड. महेंद्र असरेट व इतर प्राद्यापक वृंद व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थीत होते.
सदरील कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. सुधीर एस. इंगळे यांनी बेटी बचाव - बेटी पढाव तसेच इतर महत्वाच्या कायद्याबाबत मार्गदर्शन केले. या सोबतच अॅड. शालिक गौरकार यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा या बाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
