गोंडपिपरी तहसील मधील महानेटचे करोडो रुपयाचे साहित्य चोरीला, एफआयआर मात्र 50 हजाराची !
शासनाच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- (गोंडपिपरी)
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील तहसील कार्यालयात भारत नेट प्रकल्पाअंतर्गत महानेट सर्वर( भारत नेट)तहसिल कार्यालय गोंडपिंपरी येथे दि.04/11/2019 रोजी माहानेट नेटवर्क सव्र्व्हर बसवलेल्या होता. या नेटवर्कद्वारे, तालुक्यातील जवळपास 50 ग्राम पंचायत मध्ये महासर्वचे नेटवर्क काम करत होते.जानेवरी 2023 रोजी तहसिल कार्यालय गोंडपिंपरी च्या नविन ईमारतीचे बाधकाम सुरु झाले.
सर्वर काढून ठेवलेले संबंधित गावाचा महा नेटवर्क बंद झाल्याने गावातील अनेक शासकीय कामे खोळंबल्या गेले . तहसील मधील महा नेटवर्क करोडो रुपयांचे साहित्य चोरीला गेले,मात्र पोलीस स्टेशनला एफआयआर 50000 ची नोंद करण्यात आली!
नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले म्हणून मा. तहसिलदार साहेबांच्या आदेशाने दि. 06/01/2023 रोजी माहानेट नेटवर्क सव्र्व्हरचे साहित्य पंचायत समीतीच्या खुल्या पडीत क्वार्टर मध्ये ठेवले होते. तेव्हा पासुन सदर प्रकल्प बंद स्थितीत होता. सदर प्रकल्पाचे साहीत्य बरोबर आहे, किवा कसे याची खात्री करण्यासाठी मी दर पंधरा दिवसांनी गोंडपिंपरी ला येथ होतो. व खात्री करून परत जात होती.
दि. 8/05/2025 रोजी माहानेट चे साहीत्य बरोबर आहे, किवा कसे पाहण्यासाठी आलो असता सर्व साहीत्य बरोबर होते. त्या नंतर दि. 20/05/2025 मी साहीत्याची पाहणी करण्यासाठी आलो तेव्हा मला माहनेट प्रकल्पातील Cisco NCSRouter 5500 series आणि 2RFMS Device पाहीले असता ते दिसुन आले नाही. म्हणुन मी मा. तहसिलदार गोंडपिपरी श्री शुभम बाहाकर यांना माहीती दिली. त्यानंतर दि. 18/06/2025 रोजी मा. तहसिलदार गोंडपिपरी यांचे मला पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे Cisco NCSRouter 5500 seriesआणि 2RFMS Deviceचोरी झाल्याबाबत तक्रार नोंदविण्या करीता 7 Labh each. पत्र प्राप्त झाले. परंतु मी कामात व्यस्त असल्याने आज रोजी महानेट सर्वर (भारत नेट) करीता - एकुन Cisco NCSRouter 5500 seriesआणि 2RFMS Device कंपनीच्या जुन्या वापरत्या अंदाजे एकुण कीमत 50,000 रूपये चा माल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले आहे. तशी तोंडी रिपोर्ट कंपनीचा अभियंता राजेश सातफळे यांनी गोंडपिपरी पोलीस स्टेशनला दिली.
परंतु सूत्राच्या माहितीनुसार चोरी गेलेले डिवाइस हे कंपनीच्या माहितीनुसार करोडो रुपयाची असून करोडो रुपयाच्या साहित्याकडे संबंधित कंपनीच्या अभियंता सातफडे, तथा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाच्या कळसाने संबंधित साहित्य चोरीला गेल्याने शासनाची आर्थिक नुस्कान झाले. संबंधित साहित्याच्या चोरीचे बिल कंपनीकडून करोडो रुपयाची असल्याचे सांगितले जात असताना सुद्धा पोलीस विभागाकडून मात्र त्या सर्वरची किंमत 50 हजार रुपये अशी पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंदवण्यात आली . त्यानुसार अज्ञात इसमावर भारतीय न्याय संहिता( बी एन एस) 2023 नुसार कलम 303(२) अशी दाखल करण्यात आली आहे.
तहसील कार्याला कडून ते साहित्य करोडो रुपयाचे असल्याचे लेखी पत्र पोलीस स्टेशनला तहसीलदाराकडून दिले असताना सुद्धा एवढ्या मोठ्या किमतीचे साहित्य चोरी गेल्याची रिपोर्ट दर्ज करता येणार नाही म्हणून पोलीस विभागाकडून हेतू परस्पर तक्रार चोरी झाल्याच्या पंधरा दिवसानंतरही दाखल करण्यात आली नव्हती. संबंधित कंपनीने केलेल्या साहित्याची बिले पोलीस स्टेशनला का बरं देण्यास विलंब लावला असेल, याचाही शोध वरिष्ठ स्तरावरून व्हायला हवा.
या प्रकरणात नागरिकांना आता असा संशय यायला लागला की, संबंधित कंपनीने या साहित्याचा विल्हेवाट तर लावला नसेल ना? असाही संशय निर्माण होत आहे?
दुसरीकडे दोन महिन्यानंतर संबंधित चोरीचा कुठलाही तपास पोलिसाकडून झाला नसून आतापर्यंत चोरी गेलेले साहित्य अवगत झाला नाही याकडेही संशयाच्या भोवऱ्याने बघितल्या जात आहे.
करोडो रुपयाचे नेटवर्क( भारत नेट) सर्वर चोरीला गेले याचे सर्वस्वी जबाबदार कोण? शासनाच्या करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले त्याला जबाबदार कोण?
करोडो रुपयाचे सर्वर पडक्या खोलीत ठेवण्यात आले याला जबाबदार कोण? या नेटवर्क सर्वर साहित्याचे खरी किंमत, आणि पोलिसांकडून दाखल केलेली किंमत या तफावत असून मूळ किंमत कंपनीने एफआयआर मध्ये दाखल न केल्याने संबंधित कंपनी व पोलीस विभाग संशयाच्या भोवऱ्यात दिसून येत आहे. संबंधित प्रकरण वरिष्ठ थरावरून गांभीर्याने घेऊन याची सखोल चौकशी करावी अशी मागणी गोंडपिपरी तालुक्यातील नागरिक करत आहेत.
पोलीस निरीक्षकानी भंगार समजून त्या नेटवर्क साहित्याची किंमत 50,000 ठरवली!
ठाणेदारासोबत वार्तालाप केले असता ते म्हणाले की,
त्यांनी नवीन इस्टिमेटची किंमत सांगितली आहे. ती इलेक्ट्रिक वस्तू बंद पडलेली होती.
नेटवर्क हे भंगार बंद अवस्थेत होतं. ते चोरीला गेले त्यामुळे त्याची किंमत 50000 अशी ग्राही धरल्या गेली. परंतु कंपनीच्या म्हणण्यानुसार ते सिस्टीम करोडच्या वर असल्याचे संबंधित माहिती तंत्रज्ञान शाखेचे व्यवस्थापक यांनी संबंधित माध्यमांना बोलताना सांगितले. त्याची मूळ किंमत समजून आम्ही पोलीस निरीक्षकांना बिल व खरी किंमत सांगितली असताना सुद्धा त्यांनी एफ आय आर मध्ये दाखल करून घेतली नाही. असे सांगितले.

