जिवती तालुका हिरापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाचे घृणास्पद कृत्य! कठोर कारवाई करा - बेबी उईके
अच्छुत खोबाजी राठोड यांच्यावर कठोर कार्यवाही करून निलंबित करा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आज चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँगसच्या वतीने हीरापुर जी.प शाळेचे शिक्षक अच्छुत खोबाजी राठोड वय 49 या शिक्षकाने शिक्षण घेत असलेल्या पाचवीपर्यंतच्यां सात अल्पवयीन विद्यार्थिनींना पेपर तपासाच्या बहाण्याने कार्यालयात आळीपाळीने बोलवून अश्लील चाळे करुन बोलवून वर्षभरा पासुन अत्याचार करून मानसिक शारीरिक त्रास देण्याचे घृणास्पद कृत्य सूरू होते . परत असाच प्रकार घडल्याने एका मुलीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्या नंतर शिक्षकाचा प्रकार उघडकीस आला. याघटनेत परत किती विद्यार्थिनी सोबत अत्याचार झाला याची कसून उच्चस्थरिय चौकशी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन आज मा. पोलीस अधिक्षक अरविंद साळवी यांच्या मार्फत गृहमंत्री मा. ना. दिलीप वळसे पाटील यांना पाठविण्यात आले. या प्रकरणात आरोपिला अटक करण्यात आली असून पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिक्षक हा एक गुरू म्हणून विध्यार्ध्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी सतत प्रत्नशील असतात परंतु हि घटना शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी आहे. अश्या नराधम शिक्षक यांच्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करून निलंबित करण्यात यावे व या विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा परत अश्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हासरचिटणीस ज्योती रंगारी जिल्हाउपाध्यक्ष रश्मी झोटिग जिल्हासचिव पूजा सेरकी जिल्हासंघटक नीलिमा नरवडे सुलभा सेरकी व महीला उपस्थित होत्या.
दिनचर्या न्युज