2 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब जुनियर व आंतरजिल्हा राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणी chandrapur





2 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब जुनियर व आंतरजिल्हा राष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धा व निवड चाचणी

दिनचर्या न्युज :- 
राजुरा - महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स संघटनाद्वारे आयोजित वार्षिक सब ज्युनिअर क्रीडा स्पर्धेचे आयोजन पंढरपूर येथे केले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील संघ ची वार्षिक सब जूनियर ॲथलेटिक्स स्पर्धा व राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड चाचणी 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय विसापूर येथे आयोजित केल्या गेली आहे. सदर स्पर्धेमध्ये वय वर्षे 8 10 12 14 वर्षातील मुले व मुली सहभागी होऊ शकतात. खेळाडूंकरिता विविध वयोगटातून 50 मीटर धावणे 60 मीटर धावणे 80 मीटर धावणे 100 मीटर धावणे 300 मीटर धावणे गोळा फेक व लांब उडी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सोबतच वय वर्षे 14 व 16 वर्ष आतील खेळाडू मुले व मुली करिता आंतरजिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेकरिता निवड चाचणी आयोजित केल्या गेली आहे.
सदर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड अनिवार्य असून सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804, कु. प्रियंका मांढरे 9156776428 , श्री मयूर खेरकर 99219178001 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा संघटना अध्यक्ष डॉक्टर दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.