भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग त्यांच्याकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह दिनांक ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत साजरा करण्याचा निर्णय शासन निर्णयावर घेण्यात आला आहे राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयाला कार्यक्रमाच्या आयोजनाचे निर्देश देण्यात आली असून या संदर्भाची माहिती आज पत्रकार परिषदेतून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. मोहतुरे यांनी माध्यमांना दिली.८ एप्रिल ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त जात पडताळणी यांच्या हस्ते करण्यात आले.९ एप्रिल रोजी सर्व शासकीय वस्तीगृह , निवासी शाळा, तसेच च्या चवदार तळे सत्याग्रहाचा शताब्दी वर्ष या सर्व विविध कार्यक्रमासह संत गाडगे महाराज यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर तसेच सर्व शासकीय निवासी शाळा, शासकीय वस्तीगृह येथे करण्यात येणार आहेत. १० एप्रिल ला समता मार्फत ग्रामीण व शहरी भागात पटनात्य व लघुनाटिका, महिलांचे मिळावे, मार्जिन मनी योजनेअंतर्गत कार्यशाळा. ११ एप्रिल ला महात्मा फुले जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन १२ एप्रिल ला संविधान जागर कार्यक्रम. १३एप्रिल ला जेष्ठ नागरिकाचे जनजागृती शिबिर व आरोग्य तपासणी, व रक्तदान शिबिराचे आयोजन.१४ एप्रिल ला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाभार्थ्यांना लाभ अथवा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी डॉ.मोहतुरे यांनी दिली असून. या सर्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
