गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचे काम निष्कृट दर्जाचे !
अभियंता व कंत्राटदाराच्या , कामाची चौकशी करून कारवाईची मागणी!
दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:- प्रतिनिधी -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येत असलेल्या गडपिपरी ते गोठंगाव येथील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारे करण्यात येत आहे. हे काम नागपूर येथील एन. एन. पुगलीया या कंपनीच्या कंत्राटदाराला देण्यात आले.
या रस्त्याची लांबी ३.२४ किलोमीटर असून कामाची सुरू करण्याची दिनांक ६ /९ /२०२३ होती तर काम पूर्ण करण्याची अवधी दिनांक ५/९ /२०२४ या तारखेपर्यंत असताना ती वाढीव करून आज पर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची करारनामा किंमत १८८.३६ लक्ष असून देखभाल दुरुस्ती किंमत २०.६१ लक्ष असून या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण तसेच सिमेंट काँक्रेट रस्ता २९५ मीटर असताना मागील चार वर्षापासून या रस्त्याचे काम या कंत्राटदाराकडून अनियमितेत होत आहे. मागील वर्षी या रस्त्याचे काम सुरू झाले असून अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून संबंधित विभागाच्या अभियंत्याने व कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खराब केला असून मोजमाप पुस्तिका व अंदाजपत्रक यानुसार काम केल्याचे दिसून येत नाही. या कामाची प्रसारमाध्यम आणि स्थानिक नागरिकांसोबत पहाणी केली असता कामात मोठ्या प्रमाणात अनियमता होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. नियमानुसार रस्ता बांधकाम करण्याआधी खोदकाम करून प्रथम त्यात 40 एमएम गिट्टीचा थर टाकून चुरा गिट्टी पसरवून पाणी टाकून रोड रोलर ने योग्य दाब करणे आवश्यक असते. मात्र या रस्त्यात माती असलेल्या ठिकाणीच बारीक गिट्टीचा चुरा टाकून वर डांबराचा लाली तोप टाकण्यात आले. संबंधित गावकऱ्यांनी या कामाची पाहणी केल्या असता हाताने त्या डांबराचे पोपळे निघताना दिसून येतात. यामुळे रस्त्याची मजबुती आणि टिकाऊ पणा धोक्यात येण्याची शक्यता असून यावरून ते काम किती निष्कृष्ट दर्जाचे असेल याचा प्रत्यय येतो. येणाऱ्या पावसाळ्यात एकाच पावसात या रस्त्याची वाट लागेल असे गावकर्याकडून बोलले जाते.
याबाबत संबंधित अभियंत्याला विचारपूस केली असता. काम नियमानुसारच होत असल्याचे बोलून बगल देण्याचे काम केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा 67 ते गोठनगाव मोजा गडपिपरी येथील रस्ता बांधकामाची मोजमाप पुस्तिका( एम बी) व अंदाजपत्रक( इस्टिमेट) या संदर्भाची माहिती मागितली असता. संबंधित विभागाने माहिती अधिकाऱ्यात केराची टोपली दाखवली. माहिती देण्यास हेतू पुरस्कार ,जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचे टाळले. नंतर माहिती अपिलीय अधिकारात दिल्या गेली पण तीही परिपूर्ण नसल्याची बाप समोर येत आहे.
संबंधित कामाचे माहिती अधिकारात माहिती दिल्यास या कामाचा भ्रष्टाचार उघडकीस येईल अशी भीती या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यकारी अभियंताला आहे. म्हणून या संबंधित कामाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी आता गावकऱ्याकडून होत आहे. व संबंधित कंत्राटदारावर तसेच या कामाची देखरेख करणाऱ्या अभियंत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा गावकऱ्याकडून जन आंदोलन करण्यात येईल, या कामा संदर्भाची तक्रार जिल्हाधिकारीसह वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणार असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
