गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याच्या कामाला मोजमाप पुस्तकेच्या नियमांला ठेंगा ! पालकमंत्री ,जिल्हाधिकारी यांचेकडून चौकशी करून कारवाईचे निर्देश!




गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील   रस्त्याच्या कामाला मोजमाप  पुस्तकेच्या नियमांला  ठेंगा ! 

 पालकमंत्री ,जिल्हाधिकारी यांचेकडून चौकशी करून  कारवाईचे निर्देश!


दिनचर्या न्यूज:- 
चंद्रपूर:-  प्रतिनिधी -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येत असलेल्या गडपिपरी ते गोठंगाव येथील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारे करण्यात येत आहे. हे काम नागपूर येथील  एन.  एन. पुगलीया या कंपनीच्या कंत्राटदाराला करण्यात आले आहे.
या रस्त्याची लांबी ३.२४  किलोमीटर असून कामाची सुरू करण्याची दिनांक ६ /९ /२०२३   होती तर काम पूर्ण करण्याची  अवधी दिनांक ५/९ /२०२४  या तारखेपर्यंत असताना ती वाढीव करून आज पर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची करारनामा किंमत १८८.३६  लक्ष असून देखभाल दुरुस्ती किंमत २०.६१ लक्ष  असून या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण  तसेच सिमेंट काँक्रेट रस्ता २९५  मीटर  असताना मागील चार वर्षापासून या रस्त्याचे काम या  कंत्राटदाराकडून अनियमितेत होत आहे.
  मागील वर्षी या  रस्त्याचे काम सुरू झाले असून अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून संबंधित विभागाच्या अभियंत्याने व कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खराब   केला असून  मोजमाप पुस्तिका व अंदाजपत्रक यानुसार काम केल्याचे दिसून येत नाही.  याबाबतची तक्रार पालकमंत्री डॉ.अशोक  उईके, तथा  जिल्हाधिकारी त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्या संदर्भाचे पत्र, व माहिती घेतली असता संबंधित विभागाला  चौकशी व कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
 ही चौकशी  प्रसारमाध्यम, व संबंधित अभियंते यांच्या सक्षम व्हावी अशी तक्रारदाराची तक्रार असून ती चौकशी प्रामाणिक व्हावी. व संबंधित रस्ता मोजमा पुस्तके नुसारच व्हावा अशी मागणी होत आहे. 
या कामाची  प्रसारमाध्यम आणि स्थानिक नागरिकांसोबत  पहाणी केली असता कामात मोठ्या प्रमाणात अनियमता होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. नियमानुसार रस्ता बांधकाम करण्याआधी खोदकाम करून प्रथम त्यात मोजमाप पुस्तका त्यानुसार  काम  करण्याची गुणवत्ता, व कामात पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण काम होणे. जसे की,
GSB  20  cm, WBM  7.5 cm, MPM  5.cm, 
2 cm, कास्फेट डांबर करून ते काम पूर्ण   म्हणजे  34.5. Cm. सेंटीमीटर  याप्रमाणे काम होणे अपेक्षित होते. परंतु ते काम एमबी नुसार करण्यात आले नसल्याचे निदर्शनास येते.
एमएम गिट्टीचा थर टाकून चुरा  गिट्टी पसरवून पाणी टाकून रोड रोलर ने योग्य दाब करणे आवश्यक असते. मात्र या रस्त्यात माती असलेल्या ठिकाणीच बारीक गिट्टीचा चुरा टाकून  वर डांबराचा लाली तोप टाकण्यात आले. संबंधित गावकऱ्यांनी  या कामाची पाहणी केल्या असता हाताने त्या डांबराचे पोपळे निघताना दिसून येतात.  यामुळे रस्त्याची मजबुती आणि टिकाऊ पणा धोक्यात येण्याची शक्यता  असून यावरून ते काम किती निष्कृष्ट दर्जाचे असेल याचा प्रत्यय येतो. येणाऱ्या पावसाळ्यात  एकाच पावसात या रस्त्याची वाट लागेल असे  गावकऱ्यांकडून बोलले जाते.
याबाबत संबंधित अभियंत्याला विचारपूस केली असता. काम नियमानुसारच होत असल्याचे बोलून बगल देण्याचे काम केले.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रजिमा 67 ते गोठनगाव मोजा गडपिपरी  येथील रस्ता बांधकामाची मोजमाप पुस्तिका( एम बी) व अंदाजपत्रक( इस्टिमेट) या संदर्भाची माहिती  अधिकरात माहिती मागितली  त्यात स्पष्ट असे दिसून येते की, एमबी नुसार त्या कामाचा दर्जा करण्यात आला नाही. संबंधित कंत्राटदारांनी, व   अभियंता यांनीरस्त्याचे काम  अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून संबंधित विभागाच्या अभियंत्याने व कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खराब   केला असून  मोजमाप पुस्तिका व अंदाजपत्रक नुसार  काम केल्याचे दिसून येत नाही. 
या रस्त्यात माती असलेल्या ठिकाणीच बारीक गिट्टीचा चुरा टाकून  वर डांबराचा लाली तोप टाकण्यात आले. संबंधित गावकऱ्यांनी  या कामाची पाहणी केल्या असता हाताने त्या डांबराचे पोपळे निघताना दिसून येतात.  यामुळे रस्त्याची मजबुती आणि टिकाऊ पणा धोक्यात येण्याची शक्यता  असून यावरून ते काम किती निष्कृष्ट दर्जाचे असेल याचा प्रत्यय येतो. 
या झालेल्या रस्त्याच्या कामाची  योग्य ती चौकशी करून संबंधित अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी, व कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी होत असून, या  रस्त्याच्या कामाची तपासणी करून एमबीनुसार  काम न केल्यास  जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल.  
याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. म्हणून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी.या  कारवाई संदर्भातील  पत्र जिल्हाधिकारी मार्फत ना.जयकुमार मोरे,  कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य, कार्यकारी अभियंता, नागपूर विभाग, 
डॉ.अशोक उईके, पालकमंत्री चंद्रपूर, आदिवासी  विकास मंत्री  महाराष्ट्र राज्य, संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया, चिमूर विधानसभा  क्षेत्र  यांना देण्यात आले होते. यावर पालकपत्रांनी, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अभियंत्यास चौकशी करून कारवाईचे पत्र दिले. जिल्हाधिकारी  यांची भेट घेतली असता त्यांनी संबंधित रस्त्याच्या  बांधकामा संबंधात  कारवाईचे पत्र  दिले असल्याचे सांगितले.  संबंधित रस्ता हा मोजमाप पुस्तके नुसारच व्हावा  अन्यथा गावकऱ्यांकडून   जन आंदोलन छेडण्यात येईल असा इसाराही गावकऱ्याकडून देण्यात येत आहे.